Thu, Nov 22, 2018 16:15होमपेज › Nashik › फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 11:48PMनाशिक : प्रतिनिधी

साडेतीन शक्‍तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंग गडावरील फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते सोमवारी(दि. 2) होणार आहे. या ट्रॉलीमुळे भाविकांना अवघ्या तीन मिनिटांमध्ये  देवीचे दर्शन घेेणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी 12 वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. तेथून कारने ते सप्तशृगगडाकडे रवाना होतील. मुख्यमंत्री दुपारी 1 वाजता प्रथम गडावर फ्यूनिक्यूलर ट्रॉलीचे लोकार्पण व त्यानंतर भवानी पाझर तलावाचे उद्घाटन करतील. या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील खासदार-आमदारांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

जीपीएस प्रणालीचे उद्घाटन

ग्रामीण पोलीस दलातील वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात आली असून, ओझर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी फिरत्या पोलीस ठाण्याचेही उद्घाटन होणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यात गस्ती पथकातील वाहनांना ही प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे गस्ती पथक कुठे आहे, घटना घडल्यानंतर कोणते वाहन घटनास्थळापासून जवळ आहे याची माहिती पोलिसांना लगेचच कळणार आहे.