Sat, Jul 20, 2019 23:29होमपेज › Nashik › धर्मादाय आयुक्‍तांचा पुढाकार स्तुत्य, पण...

धर्मादाय आयुक्‍तांचा पुढाकार स्तुत्य, पण...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

राज्याच्या धर्मादाय आयुक्‍तांनी गरीब शेतकर्‍यांच्या मुलींचे विवाह लावण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असला, तरी या निर्णयावर तज्ज्ञांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. आर्थिक हलाखीमुळे मुलींचे विवाह लावण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वृत्त वाचून धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातून राज्यातील सार्वजनिक विश्‍वस्त संस्थांकडून निधी जमवून त्या माध्यमातून गरीब शेतकर्‍यांच्या मुलींचे सामूहिक विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी धर्मादाय सहआयुक्‍तांकडून बैठका घेण्यात आल्या व या निर्णयाविषयी सर्व संस्थांना अवगत करण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी समितीची स्थापनाही करण्यात आली. आयुक्‍त डिगे यांनी घेतलेला हा पुढाकार स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा असला, तरी तज्ज्ञांनी त्यावर काही आक्षेप घेतले आहेत. 

सार्वजनिक विश्‍वस्त संस्थांची नोंदणी, त्यांच्यावर नियंत्रण, नियमन राखणे, त्यांच्या दाव्यांची सुनावणी करणे आदी मूळ कामांपलीकडे जाऊन धर्मादाय आयुक्‍तालयाला अशा सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेता येतो का, विश्‍वस्त संस्थांच्या बैठका घेण्यापूर्वी यासंदर्भात शासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे का, अशी विचारणा होत आहे. धर्मादाय आयुक्‍तालयाच्या संकेतस्थळावर या निर्णयाचा अवाक्षरानेही उल्लेख करण्यात आलेला नाही. शेतकरीकन्यांच्या विवाहांसाठी आयुक्‍त डिगे यांनी घेतलेल्या पुढाकारावर शंका घेणे रास्त नाही. तथापि, या कार्यात सार्वजनिक संस्थांकडून निधी जमा केला जाणार आहे. 

Tags : Nashik, Nashik News, Funds, deposited, public, body,  work.


  •