Sun, Mar 24, 2019 17:07होमपेज › Nashik › इगतपुरीसह सातपूरमधून दारूसाठा जप्‍त

इगतपुरीसह सातपूरमधून दारूसाठा जप्‍त

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 14 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

अवैधरीत्या दारूसाठा करणार्‍या तिघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. इगतपुरी आणि सातपूरमधील हे संशयित असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्‍त केला आहे. ‘ड्राय डे’ च्या पार्श्‍वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सर्व पथकांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार क्रमांक एकच्या भरारी पथकाचे निरीक्षक प्रवीण मंडलिक यांनी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.11) इगतपुरी तालुक्यातील गंभीरवाडी येथे छापा टाकून भाऊराव पिचड यांच्या घरातून 70 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर विदेशी दारूसाठा जप्‍त केला. शुक्रवारी (दि.13) दुसर्‍या कारवाईत सातपूर येथील प्रबुद्धनगर परिसरात मयूर नामदेव लोहारे आणि वैभव बाळू साबळे (दोघे रा. वाल्मीकनगर) या दोघांना ताब्यात घेतले. दोघे संशयित कारमधून मद्य वाहतूक करताना सापडले. त्यांच्याकडून कारसह दारूचा एक लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. निरीक्षक मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णू सानप, वीरेंद्र वाघ, विलास कुवर, सुनील पाटील, विजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags : Nashik, Satpur, with Igatpuri, Liquor, stores seized, nashik news,