Wed, Nov 21, 2018 13:19होमपेज › Nashik › नाशिक : राहुड घाटात चार वाहनांचा भीषण अपघात

नाशिक : राहुड घाटात चार वाहनांचा भीषण अपघात

Published On: Aug 04 2018 7:35PM | Last Updated: Aug 04 2018 7:36PMचांदवड(जि. नाशिक) : प्रतिनिधी

चांदवड तालुक्यातील राहुड घाटात चार वाहनांचा भीषण अपघात  झाला आहे. या अपघातात एक कंटेनर घाटाच्या ५० फूट खाली कोसळला आहे. या अपघातातील जखमींना मदत कार्य सुरू आहे. 

या अपघातात सहा ते सात जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

दरम्‍यान, अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळा येत आहे.