Wed, Mar 20, 2019 23:23होमपेज › Nashik › घोटी-सिन्‍नर मार्गावर अपघातात चार ठार

घोटी-सिन्‍नर मार्गावर अपघातात चार ठार

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:56PMघोटी : वार्ताहर

सिन्‍नर-घोटी मार्गावरील उभाडे शिवारातील उंबरकोन फाट्यावर तिहेरी अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेने रविवारी (दि.17) चार वाजता रिक्षामधील चार जण ठार झाले. घटनेनंतर नागरिकांनी काही काळ महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.

रविवारी उंबरकोन येथील प्रवासी देवळे येथील रिक्षाद्वारे (क्र.एमएच-02-यूए-9808) सिन्‍नरहून उंबरकोनमार्गे जात असताना मुंबईकडून सिन्‍नरकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने भारत पेट्रोलियम पंपासमोर अज्ञात स्विफ्ट कारने धडक दिली. त्याचवेळी पाठीमागून जाणार्‍या इनोव्हा गाडी (एमएच-04-एएन-3330) या वाहनावर आदळल्याने रिक्षामधील चालकासह तीन प्रवासी जागीच ठार झाले. यामध्ये उंबरकोन येथील भास्कर कोंडाजी कोरडे (70), शिवराम विठोबा सारुक्‍ते (42), अर्जुन बहिरू सारुक्‍ते (40) व देवळे येथील रिक्षाचालक अविनाश मोहन दालभगत (22) हे जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोको केला. पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक विलास घिसाडी यांनी परिस्थिती पाहता तातडीने राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या महामार्गावर मागील आठ दिवसांत याच ठिकाणी दोन जण जागीच ठार झाले होते.