Thu, Apr 25, 2019 14:05होमपेज › Nashik › दिंडोरीजवळ अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

दिंडोरीजवळ अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 23 2018 1:18AMदिंडोरी : वार्ताहर

नाशिक -कळवण राज्य मार्गावरील वनारवाडी फाट्यावर झायलो व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील  पती, पत्नी व मुलगा हे तिघे  ठार झाले असून, झायलो चालकाचाही जागीच मृत्यू झाला आहे.               

दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक -कळवण मार्गावरील वनारवाडी फाट्यावर (दिं. 21) रात्री 9. 15  वाजेच्या दरम्यान झायलो (क्रं एम एच-02 बीटी 84 24 ) नाशिककडे जात असताना समोरून दिंडोरीकडे येत असलेल्या  दुचाकी  (क्रं. एम एच -15 एच 5520 ) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. दुचाकीस्वार   राजाराम पाडूरंग बोराडे (50), सुनीता राजाराम बोराडे, भाविश राजाराम बोराडे (17) राहणार पाडे , हे एकाच कुटुंबांतील तिघे जण ठार झाले. ते नातेवाइकांचा एक कार्यक्रम आटोपून घरी  येत होते.  दुर्दैवाने ते अपघातात  जागीच ठार झाले.  

तर पिंपळगाव धुम येथील झायलो चालक राहूल वसंत बेजेकर (27) हे जागीच ठार झाले.   दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सह्यायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाडवी, पो. ह.आव्हाड पुढील तपास करीत आहे.