Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Nashik › माजी खासदार राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन

माजी खासदार राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 11:07PMदेवळाली कॅम्प : वार्ताहर

आयुष्यातील चाळीस वर्षे हजारो शिवसैनिकांना घडविणारे राजाभाऊ गोडसे  हे आपलेच नव्हे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही लाडके व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्ह्यातील शिवसेना पोरकी झाली आहे, अशा शब्दांत माजी मंत्री व सेनेचे उपनेते बबन घोलप यांनी भावना व्यक्‍त केल्या.

लॅम रोडवरील देवळाली सुपर स्पेशालिटी रुग्णालयापासून सकाळी 9 वाजता हजारो नागरिक, शिवसैनिक यांच्या उपस्थितीत राजाभाऊ गोडसे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. लॅम रोड, आनंद रोड, वडनेर रोडवरील त्यांच्या कार्यालयाजवळ अंतिम दर्शनासाठी अंत्ययात्रा थांबविण्यात आली. येथेेे चाहत्यांनी अंतिमदर्शन घेतले  ही अंत्ययात्रा पुढे संसरी येथील त्यांच्या निवासस्थानी आणली. यानंतर अभूतपूर्व गर्दीने आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. यावेळी वैकुंठरथामध्ये मुलगा युवराज गोडसे, दोन्ही मुली, पत्नी तसेच खासदार हेमंत गोडसे हे होते. त्यानंतर  साडेअकरादरम्यान दारणा तीरावरील स्मशानभूमीत अग्निडाग देण्यात आला. यावेळी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी अंतिम निर्वाण भजन म्हणून राजाभाऊ गोडसे यांना अखेरचा निरोप दिला. 

मविप्रच्या सरचिटणीस  नीलिमा पवार  यांनी मविप्रचा आधारवड गेल्याचे म्हटले.  तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ अस्तास गेल्याचे म्हटले. याशिवाय आमदार बाळासाहेब सानप, माजी आ. वसंत गिते, अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, आमदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर  दशरथ पाटील, उदय सांगळे,  दत्ता गायकवाड  माजी आ. जयंत जाधव, विश्‍वनाथ काळे,  सतीश मेवानी,  राहुल दिवे,  संपत सकाळे,  लक्ष्मण मंडाले, निवृत्ती अरिंगळेे, दिनकर आढाव,  शिवाजी चुंभळे,  मुरलीधर पाटील, बाबूराव मोजाड, नामदेव गोडसे, सत्यभामा गाडेकर,  आमदार योगेश घोलप, सुधाकर बडगुजर, राजश्री  अहिरराव,  सचिन  ठाकरे,  भगवान कटारिया, भाऊसाहेब धिवरे, तानाजी करंजकर, प्रा. विजय मेधने, प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड, अशोक सातभाई, प्रीतम आढाव, संभाजी मोरुस्कर, सरोज अहिरे, रामदास सदाफुले, आशा गोडसे  आदी उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी (दि.18) देवळाली कॅम्प शहर व्यापारी असोसिएशनने कडकडीत बंद पाळला.