Sat, Nov 17, 2018 16:20होमपेज › Nashik › राणेंना नाशिकमधून उमेदवारीसाठी हालचाली

राणेंना नाशिकमधून उमेदवारीसाठी हालचाली

Published On: Dec 12 2017 7:48AM | Last Updated: Dec 12 2017 7:48AM

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर

विधान परिषदेसाठी होणार्‍या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आता भाजपाने डबल खेळी करून नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. राणे यांना उमेदवारी मिळाल्यास ते नक्‍कीच विजयी होतील, असा दावा राणे प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाददादा जामखिंडीकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला.

स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते आणि राणे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांची लवकरच सहविचार सभा होणार असून, यामध्ये निवडणुकीची दिशा ठरवली जाणार आहे. नारायण राणे जर नाशिकमधून निवडून गेले तर नाशिकबरोबरच उत्तर महाराष्ट्राचा कायापालट करून टाकतील, असे मत जामखिंडीकर यांनी व्यक्‍त केले. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी आणि संघटना प्रवेशासंबंधी लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे जामखिंडीकर यांनी सांगितले. जवळपास 95 टक्के उमेदवारी निश्‍चित झाली असून, अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.