Mon, Jan 21, 2019 23:58होमपेज › Nashik › वनक्षेत्राला आग लागून वृक्षांचे नुकसान

वनक्षेत्राला आग लागून वृक्षांचे नुकसान

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:44PM

बुकमार्क करा
दरेगाव : वार्ताहर

चांदवड तालुक्यातील पूर्व विभागातील नाशिक पूर्व विभागांतर्गत येणार्‍या वनविभागाच्या चांदवड-मनमाड महामार्गालगतच वनपरिक्षेत्रात आग लागून सुमारे दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्रातील वृक्षांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. वनविभागाने स्थानिक गावकर्‍यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली.

मेसनखेडे खुर्द व पिंपळगाव धाबळी शिवारात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. तसेच, डोंगरावर व डोंगरउतारावर वृक्ष आहेत. यापूर्वीची मोठी झाडे आहेत. तसेच या परिक्षेत्रात 2015-16 या वर्षात जल व मृद्संधारण कामातून नवीन रोपवन लागवडही झाली होती. मेसनखेडे शिवारात 25 हेक्टर क्षेत्र आहे. पिंपळगाव धाबळी शिवारात जास्त नुकसान झाले आहे. तसेच, मेसनखेडे खुर्द शिवारातही नुकसान झाले आहे. या जंगलातील करंज, शिवण, कडुलिंब, सीताफळ, आवळा, बांबू, बोर, कांचन, आपटा यांसारख्या वृक्षांचे नुकसान झाले  झाले. ग्रामस्थांनी सकाळी आगीची माहिती वनविभागास देताच चांदवड वनविभागाचे वनपाल एच. बी. उबाळे, वनरक्षक व्ही. जी. पवार, व्ही. एन. खरात यांनी ग्रामस्थ व वनमजुरांचा सहाय्याने आग आटोक्यात आणली. मेसनखेडे वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष अंबादास ठोंबरे, गंगाधर बिडगर, पोलीसपाटील अनिल ठोंबरे, सोनू ठोंबरे,  वनमजूर भरत वाघ, समाधान ठाकरे, अशोक शिंदे, अशोक आहेर, दयानंद कासव, नामदेव पवार यांच्या मदतीने आग विझविली.