होमपेज › Nashik › सुरगाण्याच्या उपनिरीक्षकासह पाच पोलीस निलंबित

सुरगाण्याच्या उपनिरीक्षकासह पाच पोलीस निलंबित

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:32PMसुरगाणा : वार्ताहर

तालुक्यातील उंबरठाण दूरक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात कुचराई केल्या प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे.

उंबरठाण व परिसरात मागील अनेक वर्षांपासून अवैध धंदे जोरात सुरू आहेत. हे धंदे बंद करण्यात यावे, या मागणीने जोर  धरला होता. मात्र, स्थानिक पोलिसांकडून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे सांगितले जात होते. अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांकडून अभय मिळत असल्याने जिल्हास्तरावरून छापे टाकण्याची मोहीम राबविण्यात येत होती. 

शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सुरगाणा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक एस. एस. माने, पोलीस हवासदार सी. एस. दवंगे, पी. के. सहारे, एम. के. चारोस्कर, पोलीस कॉन्स्टेबल आय. पी. बर्डे या पाच पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी निलंबन केल्याचे कळविल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Tags : Nashik, Five policemen, suspended, sub-inspector,