Sun, May 19, 2019 14:50
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › धुळे-नरडाणा रेल्वे मार्गावर पाच पूल

धुळे-नरडाणा रेल्वे मार्गावर पाच पूल

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 10:39PMधुळे : प्रतिनिधी 

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गातील धुळे ते नरडाणा मार्ग दरम्यान पाच पूल प्रस्तावित आहेत.त्याची निविदा प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी माहिती देताना सांगितले.

धुळ्यात झालेल्या पत्रकार परिपदेत खा. भामरे बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, विनोद मोराणकर, हिरामण गवळी, अरविंद जाधव, डॉ माधुरी बाफना, माजी महापौर जयश्री अहिरराव, रत्नाताई बडगुजर, नगरसेवक संजय जाधव आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना भामरे म्हणाले की, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले  जनतेचे स्वप्न आता पुर्णत्वास येत आहे.हा प्रकल्प इंदौर- मनमाड रेल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पुर्ण केला जाणार या  प्रकल्पातच कल्याण - इगतपुरी ही तिसरी रेल्वे लाईन टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषदेत आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता खा.भामरे यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.  दे म्हणाले की, भूलथापा देणारी मंडळी जनतेची दिशाभूल करीत आहे.त्यामुळे खरी माहिती जनतेपर्यंत जात नाही. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग सहा वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प अत्यावश्यक बाबीमधे समाविष्ट करण्यात आलेला असल्याने यासाठी भूसंपादन करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. धुळे ते नरडाणा दरम्यान सरकारी जमिनीवर प्रथम रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे,असे खा. भामरे यांनी सांगितले.