Sun, May 19, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › गोदाकाठ भागात संततधार; गावांना सतर्कतेचा इशारा

गोदाकाठ भागात संततधार; गावांना सतर्कतेचा इशारा

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:41PMसायखेडा : वार्ताहर

दारणा, मुकणे, गंगापूर धरणक्षेत्रात तसेच नद्यांच्या परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरीला यावर्षीचा पहिला पूर आला आहे. त्यामुळे नेहमीच पुराच्या चर्चेत असलेल्या सायखेडा, चांदोरी भागात गोदावरीने पात्र ओलांडले आहे. संततधार सुरू राहिल्यास आणखी पाणी वाढण्याची शक्यता असल्याने गोदाकाठ भागात सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सायखेडा व चांदोरी हे बाजारपेठेचे ठिकाण असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास किराणा दुकान, हॉटेल, कापड, रासायनिक खते, फर्निचर व्यावसायिक, तसेच घरात पाणी शिरत असल्याने संसारोपयोगी वस्तू, टीव्ही, कॉम्प्युटर, कपडे तसेच पूरपावसाच्या पाण्यामुळे वाहून जाते. तसेच नदीकाठावरील सोयाबीन, ऊस, मका, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान होते. जेव्हा दारणा, गोदावरीच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यास गंगापूर, दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळे दारणा, गोदावरीच्या संगमापुढील गोदाकाठ भागातील दारणासांगवी, शिंपीटाकळी, चाटोरी, सावळी, सायखेडा, चांदोरी, नागापूर, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, कोठुरे, कारगाव, चापडगाव, मांजरगाव आदी गावांमध्ये पुराचे पाणी घुसते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत, नांदूरमध्यमेश्‍वर धरणाचे पूर्ण दबाने पाणी सोडल्याने पुराची झळ सध्या तरी बसली नाही. तरीही सायखेडा येथील समतल भागात पाणी शिरल्याने, वीटभट्टया, मंदिरे पाण्यात, तर चांदोरी येथील मंदिरे गडप झाली आहेत.