Thu, Jun 20, 2019 00:44होमपेज › Nashik › नाशिकरोड परिसरात युवकावर गोळीबार

नाशिकरोड परिसरात युवकावर गोळीबार

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:59PMचेहेडी : प्रतिनिधी 

एकलहरा कॉलनीतील युवकावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. यात युवक जखमी झाला असून,  अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एकलहरा कॉलनी परिसरात ही घटना घडली असून, मुकेश रावसाहेब सपकाळ (22) हा रात्री 11 वाजता मोबाइल रिचार्ज करण्यासाठी एकलहरा कॉलनी येथील आत्मदीप वाघमारे यांच्या घरासमोरील ठिकाणी गेला. त्याचवेळी गोळी लागल्याचा आवाज आला आणि तो जखमी होऊन खाली कोसळला. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.