होमपेज › Nashik › कुशावर्तासाठी निधी कमी पडू देणार नाही

कुशावर्तासाठी निधी कमी पडू देणार नाही

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:41PMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

त्र्यंबकच्या कुशावर्तावर देश-विदेशातून भाविक येतात. त्यामुळे कुशावर्ताची सुरक्षा व स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. कुशावर्ताच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. श्रावणी सोमवारचा पर्वकाळ साधत भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पूजा अभिषेक केला. त्यावेळी ते बोलत होते.

कुशावर्ताच्या पाण्यास दुर्गंधी असल्यास त्याची अपकीर्ती होते, याची दखल घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. शुद्धीकरणासाठी अद्ययावत यंत्रणा वापरण्याचे सुचविण्यात आले. यावेळी मुनगंटीवर कुशावर्ताकडे न जाता मंदिरातूनच परत फिरले. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर, बांधकाम सभापती दीपक लोणारी, शहाराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र आदी पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. त्र्यंबकेश्‍वर मंदिरात पूजा झाल्यानंतर त्यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्र्यंबक नगरपालिकेने मागणी केलेल्या 13.5 कोटींच्या विकासकामांच्या निधीची पुरवणी अर्थसंकल्प जुलै 2018 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर नगरपालिका क्षेत्रात करावा आणि भाविकांसह नागरिकांना सुविधा निर्माण होतील, अशी कामे झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त त्यांनी व्यक्‍त केली. याप्रसंगी नाशिक येथील भाजपाचे पदाधिकारी होते. मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, तहसीलदार महेंद्र पवार, वनविभागाचे अधिकारी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर, रामचंद्र गुंड यांनी मुनगंटीवार यांना त्र्यंबकेश्‍वराची प्रतिमा भेट दिली.