Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Nashik › घरकुल घोटाळ्यात गुन्हा दाखल करा : आयुक्‍त मुंढे

घरकुल घोटाळ्यात गुन्हा दाखल करा : आयुक्‍त मुंढे

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 02 2018 10:49PMनाशिक : सफाई कर्मचार्‍यांसाठी तयार केलेल्या घरकुल योजनेतील 10 घरे नातलगांना देऊन मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा गैरवापर करून कर्मचार्‍यांमध्ये दहशत करणार्‍या दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळकत व परवाने विभागाचे उपायुक्‍त महेश डोईफोडे यांनी पुर्व विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. सुरेश दलोड आणि ज्योती तसांबड अशी घरकुल घोटाळ्यातील संशयित सूत्रधारांची नावे आहेत. नाशिक महानगर पालिका सफाई कर्मचारी घर बचाव समितीने मार्च महिन्यात मनपा आयुक्‍तांना निवेदन देत हा प्रकार उघडकीस आणला होता. महालक्ष्मी चाळ येथे घरकुल योजना राबवण्यात आली. मात्र या योजनेत सुरेश दलोड यांनी त्यांच्या नातलगांनाच घर दिले. तसेच कर्मचार्‍यांचे गृहकर्ज लाटून करारनाम्याचा भंग केल्याचा आरोप सफाई कर्मचार्‍यांनी केला. त्यानंतर दलोड यांनी फ्लॅट घ्या, नाहीतर घरे खाली अशी बळजबरी करीत मी जागेचा मालक आहे, मनपाने माझ्या नावावर साडेचार एकरचा भूखंड केला असल्याचेही सांगितले. जे लोक विरोध करतील त्यांची घरे पाडून टाकू, अशी चर्चा मनपा आयुक्‍तांसोबत झाल्याचे सांगत दलोड यांनी धमकावले. या निवेदनाची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशी केली. त्यात सुरेश दलोड आणि ज्योती तसांबड यांना खुलासा मागितला होता. मात्र, दोघांनीही असमाधानकारक खुलासा दिल्याने दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.