Tue, Jul 23, 2019 17:37होमपेज › Nashik › ​​​​​​​नाशिक : करवाढ विरोधातील बैठकीला नेत्यांची पाठ; शेतकरी संतप्त

​​​​​​​नाशिक : करवाढ विरोधातील बैठकीला नेत्यांची पाठ; शेतकरी संतप्त

Published On: Apr 21 2018 12:54PM | Last Updated: Apr 21 2018 12:54PMअंबड (नाशिक) : प्रतिनिधी  

अंबड येथे करवाढीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सत्ताधारी भाजप व शिवसेना नगरसेवकांनी पाठ फीरवल्याने शेतकरी वर्गात कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

महापालिकेने शेतीवर कर लावल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक अंबड येथील मारुती मंदिरात घेण्यात आली. यामध्ये सोमवारी दि.२३ राजी  महापालिकेवर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने शेतकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहान केले आहे.

या बैठकीला माजी नगर सेवक तानाजी फडोळ, शांताराम दातीर, खंडेराव दातीर, गणपत दातीर, वामनराव दातीर, रामदास दातीर आदींसह अंबड गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : Farmers, angry, political, leader, meeting, agriculture