Sat, Jul 20, 2019 15:00होमपेज › Nashik › नांदगावी कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

नांदगावी कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Sep 11 2018 1:54AM | Last Updated: Sep 10 2018 11:12PMनांदगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील साकोरा येथील शेतकर्‍याने सततची नापिकी, अत्यल्प झालेल्या पावसाने केलेला खर्च वसूल होणार नसल्याने तसेच सावकारी कर्जाला कंटाळून सोमवारी (दि.10) सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

सोमवारी सकाळी पुन्हा साकोरा येथील शेतकरी सुनील बाजीराव बोरसे (51) याने भुसावळकडे जाणार्‍या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. नांदगाव तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला असून, आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून दुबार पेरणी करूनही पीक जळत असल्याचे पाहून त्यासाठी दोन लाख रुपये खासगी कर्ज कसे फेडायचे, त्याचप्रमाणे गेल्यावर्षी मुलीचे लग्न झाले. या सर्व कारणामुळे बोरसे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.