Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › दिंडोरी तालुक्यात शेतकर्‍याची आत्महत्या 

दिंडोरी तालुक्यात शेतकर्‍याची आत्महत्या 

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:21PMनाशिक :प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील कोर्‍हाटे येथे सोमनाथ प्रताप कदम (40) या शेतकर्‍याने सोमवारी घरातच विषप्राशन करून आत्महत्या केली. जिल्ह्यातील यंदाची 28 वी शेतकरी आत्महत्या आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, कदम व त्यांच्या आईच्या नावे मौजे कोर्‍हाटे येथे सामाईक 0.54 हे. आर क्षेत्र असून नाशिकमधील देना बँकेच्या भद्रकाली शाखेत सोमनाथ कदम यांच्या नावे 19 लाख रुपयांचे कर्ज आहे. शेतीमालाला भाव नसल्याने कर्जफेड अशक्य होऊन त्यातून कदम यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. चालू वर्षात 28 शेतकर्‍यांनी शेतमालाचे घसरलेले भाव आणि बँकेचे कर्ज यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. गत महिन्यात सर्वाधिक 10 शेतकर्‍यांनी जीवनप्रवास संपविला आहे. त्या खालोखाल जानेवारीत 9 तर चालू महिन्यात 5 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात 4 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.