Thu, Apr 25, 2019 07:42होमपेज › Nashik › गोदाकाठ भागात दूध संकलन केंद्र सुरू 

गोदाकाठ भागात दूध संकलन केंद्र सुरू 

Published On: Jun 04 2018 1:06AM | Last Updated: Jun 03 2018 10:33PMसायखेडा : वार्ताहर

शेतकरी संपाला तिसर्‍या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. परिणामी गोदाकाठ भागातील दूध केंद्र सुरू झाले असून, शेतमालाचे दर मात्र, वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ऐतोहासिक शेतकरी संपाला वर्ष उलटूनही शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडल्याने, निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी शेतकर्‍यांच्या मागण्या केंद्र सरकारच्या आख्यारित्याखाली येत असल्याने, सुमारे 140 शेतकरी संघटना एकत्र येत 22 राज्यात देशव्यापी संपाचे हत्यार पुन्हा उचलण्यात आले आहे. त्यात गोदाकाठातील शेतकरी वशेतकरीही सहभागी झाले आहेत.  

गोदाकाठ भागात असलेल्या पराग, वारणा, प्रभात, अमूल, पंचमहाल, गोवर्धन, थोरात आदींच्या केंद्रावर शुक्रवारी, शनिवारी दूध संकलन ठप्प होते. तर 90-100 दुध संकलन केंद्रावरुन सुमारे 40-45 हजार लिटर दूध संकलन होत असलेल्या, डेअरी पॉवरमध्ये संपामुळे शुक्रवारी (दि.1) दीड-दोन हजार लिटर, तर शनिवारी (दि.2) अडीच-तिन हजार लिटर संकलन झाल्याने, लाखो रूपयांचा फटका बसला होता. त्यामुळे या भागात संपाची धार तीव्र होत, शेतकरी पुत्रांनी हा संप हातात घेऊन स्वतःची लढाई स्वतासाठी लढत, भूमिपुत्रांनी संप पुढे न्यायचा होता. मात्र, नियोजन, नेतृत्व आणि जिल्ह्यात शेतकरी संघटनांमध्ये झालेली दुफळी, तर गतवर्षी झालेल्या उद्रेकामुळे घाबरत घाबरत दोन दिवस बंद असलेला संप तिसर्‍या दिवशी फिस्कटला आहे.