Mon, Mar 25, 2019 13:58होमपेज › Nashik › निफाडला शेतकर्‍याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू

निफाडला शेतकर्‍याची आत्महत्या; त्र्यंबकमध्ये एकाचा बुडून मृत्यू

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 11:42PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील नारायणगाव येथे विषप्राशन करून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महेश सीताराम संगमनेरे (42) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. दुसर्‍या घटनेत त्र्यंबकेश्‍वरमध्ये विहिरीत बुडून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्‍त केली जात आहे. जिल्ह्यातील यंदाची शेतकरी आत्महत्येची ही 103 वी घटना आहे. संगमनेरे यांनी शुक्रवारी (दि. 22) आत्महत्या केली. संगमनेरे यांच्याकडे शेती असून, कर्जही असल्याची माहिती प्रशासनास मिळाली आहे. मदत देण्याबाबत तालुका समितीकडून  सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा समितीवर हे प्रकरण ठेवले जाईल.

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील मौजे टाकेदेवगाव येथील काशिनाथ भागा झोले (62) या शेतकर्‍याच्या मंगळवारी (दि. 26) विहिरीत बडून मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार झोले यांच्या नावावर 7/12 असून त्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.