Sun, Nov 18, 2018 22:48होमपेज › Nashik › दमण निर्मित विदेशी दारू जप्‍त

दमण निर्मित विदेशी दारू जप्‍त

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:46PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

त्र्यंबेकश्‍वर येथील अंबोली फाटा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करीत दमण निर्मित विदेशी दारूसाठा जप्‍त केला आहे. यात गोविंद भोर (रा. नाशिक) या संशयितासही ताब्यात घेतले असून, एक कारही जप्‍त करण्यात आली आहे. विभागीय उपआयुक्‍त पी. पी. सुर्वे, अधीक्षक सी.बी. राजपूत, उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

निरीक्षक एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक उत्तम आव्हाड यांच्या पथकाने बुधवारी (दि.10) अंबोली फाटा येथे कारवाई केली. त्यात व्हॅगनआर कारमधून संशयित गोविंद भोर हा विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यास अटक केली असून, त्याच्याकडून कार आणि दारुसाठा जप्‍त केला आहे. न्यायालयाने गोविंदला शुक्रवारपर्यंत (दि.12) पोलीस कोठडी सुनावली आहे.  

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने, चांदवड जवळील कोलटेक फाटा येथे इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यात विनापरवाना देशी दारूची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे भरारी पथकाने सूर्यभान जगताप यास ताब्यात घेत त्याच्याकडून कारसह देशी दारु असा 11 लाख 49 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.