Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मुंगसरे गावठाणावर तहसीलचा बुलडोझर

मुंगसरे गावठाणावर तहसीलचा बुलडोझर

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:37PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मुंगसरे गावातील गावठाणवर तहसील कार्यालयाने शनिवारी (दि.2) बुलडोझर फिरवीत सशस्त्र पोलीस बंदोबस्तात येथील 25 ते 30 झोपड्या हटविल्या. तीस वर्षांपासून वास्तव्य असलेल्या या रहिवाशांवर ऐन थंडीत बेघर होण्याची वेळ आली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शनिवारी तहसील कार्यालयाने कडेकोट आणि सशस्त्र पोलीस बंदोबस्तात या गावठाणवर कारवाई केली. बुलडोझरच्या सहाय्याने सुमारे 25 ते 30 झोपड्या हटविल्या.  कारवाईस विरोध करणार्‍यांना पोलीस बळाचा वापर करून बाजूला करण्यात आले. कुठलीही पूर्वसूचना द देता कारवाई केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पूर्वीचे मुंगसरे गाव ज्या गावठाणच्या जागेत वसलेले होते, त्या जागेत सुमारे 30 वर्षांपासून 25 ते 30 कुटुंबांचे वास्तव्य होते. दोन वर्षार्ंपूर्वी ग्रामपंचायतीने ही जागा शासनाकडे वर्ग केली. त्यानुसार सातबारा उतार्‍यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागले खरे; मात्र या जागेत वास्तव्य करणारे याबाबत अनभिज्ञ होते.