Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Nashik › महिंद्रा इंटरट्रेडसमोर कामगारांचे उपोषण

महिंद्रा इंटरट्रेडसमोर कामगारांचे उपोषण

Published On: Mar 01 2018 1:31AM | Last Updated: Feb 28 2018 11:26PMअस्वली स्टेशन : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगांमध्ये स्थानिक कामगारांना विविध अडचणी भेडसावत आहेत. एखाद्या कंपनीचा प्रश्‍न कुठे मार्गी लागत नाही तोच दुसर्‍या कंपनीतील कामगार आपल्या न्याय, हक्‍कासाठी आंदोलनाचे शस्त्र हाती घेत आहेत. आज वसाहतीतील नावाजलेल्या महिंद्रा इंटरट्रेड प्रा. लिमिटेड या कंपनीतील सुमारे सहा कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे त्या सहा कामगारांसह उर्वरित कामगार व त्यांचे कुटुंब कंपनी प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

कंपनीतील सुमारे 37 कामगारांनी नव्याने स्थापन झालेल्या रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे सभासदत्व दि. 25 जानेवारीला स्वीकारून आपल्या मागण्या कंपनी व्यवस्थापनासमोर ठेवल्या. मात्र, सदर युनियनचे सभासत्व स्वीकारल्यामुळे व्यवस्थापनाकडून धमक्या, त्रास दिला जात असल्याचे कामगारांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 21 फेब्रुवारी रोजी सर्व कामगारांना एकाच शिफ्टमध्ये बोलावून सकाळी त्यापैकी सहा कामगारांना गेटच्या आत घेतले नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. याबाबत दुसर्‍याच दिवशी युनियनने पत्र देऊन कामगारांना कामावर घ्यावे याबाबत पत्रव्यवहार करूनही कुठलीच दखल घेतली नसल्याचे कामगारांनी सांगितले.  यासाठी हे सर्व कामगार व त्यांचे कुटुंब बुधवारी (दि. 28) सकाळपासून येथे उपोषणाला बसले आहे.

दरम्यान, गुरुवारी ( दि. 1 मार्च) दुपारी तीन वाजता कंपनी व्यवस्थापन यावर तोडगा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच गणपत जाधव, उपसरपंच कमलाकर नाठे, अशोक नाठे, माजी सरपंच रमेश जाधव, विजय नाठे आदींसह वाडीवर्‍हेचे उपसरपंच अंबादास कातोरे, ज्येष्ठ नेते खंडेराव धांडे, भाऊसाहेब आवारी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी हा लढा तीव्र करू असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी गायकर, दशरथ बोराडे, महादू नाठे, गणेश राजोळे, अंकुश कातोरे, रुंजा भोर, सूर्यभान बोराडे, विलास जाधव, नारायण गोवर्धने, शिवाजी नाठे, संतोष शेजवळ, स्वप्नील गांगुर्डे, प्रकाश शिंदे, गणेश जाधव, केशव नाठे आदींसह कामगार उपस्थित होते.