Mon, Jun 17, 2019 14:27होमपेज › Nashik › जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींची 26 सप्टेंबरला निवडणूक

जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींची 26 सप्टेंबरला निवडणूक

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 11:25PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 26 सप्टेंबरला मतदान तर 27 ला मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी याच निवडणुका होणार आहेत. ग्रामस्थ त्यांच्या मतदानातून थेट भावी सरपंचाची निवड करतील. 

राज्यातील ऑक्टोबर 2018 ते फेबु्रवारी 2019 या काळात मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. 23) जाहीर केला. यामध्ये 1041 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 69 ठिकाणी थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणुका होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तहसीलदार सोमवारी (दि. 27) निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. उमेदवारांना 5 ते 11 सप्टेंबर या काळात रविवार सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज दाखल करायचा आहे. बुधवारी (दि.12) दाखल अर्जांची सकाळी 11 वाजता छाननी केली जाईल. शनिवारी (दि.15) दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी दुपारी अंतिम उमेदवारांची यादी तसेच चिन्हवाटप केले जाईल.  दरम्यान, 29 सप्टेंबरपर्यंयत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करायची आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 

या ग्रामपंचायतीत मतदान

इगतपुरी : धारगाव, शिरसाटे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दौंडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सदो. त्र्यंबकेश्‍वर : महादेवनगर, सापगाव, हरसुल, होलदारनगर, वायघोळपाडा. निफाड: पालखेड. येवला : शिरसगाव लौकी. बागलाण : जामोटी. देवळा : वरवंडी. नाशिक : पिंपळगाव गुरूडेश्‍वर. 

सरपंच निवड :- पिंपळगाव (नाशिक), टाकेघोटी, (इगतपुरी), वनारवाडी, गवळवाडी, ननाशी (दिंडोरी), भवाडे (बागलाण), तारूखेडले (निफाड), निवाणे (कळवण).