Thu, Sep 20, 2018 07:59होमपेज › Nashik › जादूटोण्याच्या संशयातून येवल्यात वृद्धेचा खून

जादूटोण्याच्या संशयातून येवल्यात वृद्धेचा खून

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 1:31AMयेवला : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील रायते येथे एका सत्तर वर्षीय वृद्धेचा एका तरुणाने डोक्यात कुर्‍हाड घालून निर्घृण खून केला. शनिवारी (दि.4) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या तरुणाने इंदुबाई शंकर नाईकवाडे (70) या वृद्धेने जादूटोणा केला म्हणून आपल्या मामाची पाच महिन्याची मुलगी मृत पावल्याचे कारण पुढे करीत तिच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केले.

या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित तरुणास ताब्यात घेतले असून, तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरामध्ये घबराट निर्माण झाली असून, येवला शहर पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.