होमपेज › Nashik › एकलव्य संघटनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

एकलव्य संघटनेचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

Published On: Mar 14 2018 12:51AM | Last Updated: Mar 13 2018 11:49PMचांदवड : वार्ताहर

‘कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जमीन आमच्या हक्‍काची नाही, कुणाच्या बापाची, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा’ अशा एक ना अनेक घोषणा देत आदिवासी बांधवांनी संपूर्ण चांदवड शहरातील गल्लीबोळातून प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन चांदवडचे उपविभागीय प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले.

चांदवड तालुका एकलव्य संघटनेच्या वतीने तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या न्यायहक्‍कासाठी कृषी उत्पन्‍न बाजार समिती ते प्रांत कार्यालय असा मोर्चा मंगळवारी (दि.13) भर उन्हात काढण्यात आला. मोर्चा बाजार समिती, बसस्थानकमार्गे आठवडे बाजार, सोमवार पेठ, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौकमार्गे प्रांत कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्व महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयाच्या आवारात आल्यावर या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले.

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस हवालदार नरेश सौंदाणे, सलीम शेख, मुज्जमील देशमुख, दीपक मोरे, योगेश हेमांडे आदींनी बंदोबस्त ठेवला. यावेळी मनमाड येथील दंगा नियंत्रण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. या मोर्चात एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे, उपाध्यक्ष पवन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नितीन मोरे, सरचिटणीस किरण ठाकरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रतन सोनवणे, उत्तर महाराष्ट्र संघटक बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर वाघ, मोठाभाऊ दळवी, वैभव सोनवणे, चांदवड तालुका एकलव्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी गुंजाळ, उपाध्यक्ष बारकू गांगुर्डे, कार्याध्यक्ष संजय पवार, तालुका संघटक सदाशिव गोधडे, सोमनाथ माळी, समाधान गांगुर्डे, अमोल पवार, दशरथ माळी, अनिल गवळी, साहेबराव ठाकरे, संजय पवार आदी सहभागी झाले होते.