Wed, Jul 24, 2019 08:16होमपेज › Nashik › ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात

ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:50PM

बुकमार्क करा

जुने नाशिक : वार्ताहर

‘हिंदुस्थान झिंदाबाद, देशाची एकता, अखंडता, प्रगती व आतंकवादाच्या बिमोडाची दुवा पठण करत नार-ए-तकबीर अल्लाहू अकबर, एक नारा मोहम्मदी, नुरवाला हमारा नबी, या रसुलअल्लाह या रसुलअल्लाह’ च्या धार्मिक घोषणा देत शनिवारी (दि. 2) ‘जगा व जगू द्या’, अहिंसा व मानवतेची शिकवण देणारे सत्यवादी पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांची जयंती जश्‍ने ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त जुलूस-ए-मोहम्मदी काढण्यात आला. 

तत्पूर्वी मुस्लिम धर्मगुरूंनी देशाच्या प्रगतीसाठी विशेष दुवा करत देशावरील सर्व संकटे नष्ट होऊन, विविधता, एकता व अखंडता कायम रहावी यासाठी प्रार्थना केली. प्रसंगी मुस्लिम बांधवांनी दिलेल्या इस्लाम झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होता.

सायंकाळी चार वाजता जुने नाशिक येथील ऐतिहासिक जहाँगीर मशीद चौकातून जुलूस-ए-मोहम्मदी धार्मिक नाशिककचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जुलूसला प्रारंभ झाला. तत्पूर्वी विविध सामाजिक व धार्मिक संस्थासह पोलीस प्रसासनातर्फे मुस्लिम धर्मगुरूंचा सत्कार केला. जुलुसच्या अग्रभागी इस्लामी ध्वज हातात घेतलेला अरबी वेशातील घोडेस्वार, सजावट केलेली वाहने व घोडाबग्गी होती. रिमोट कार व बुलेट मोटार सायकलवर विराजमान चिमुकले जुलूसमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून आकर्षक सजावटसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुलूसमध्ये सामाजिक व धार्मिक संस्थातर्फे चॉकलेट, मिठाईचे वाटप करण्यात आले. डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करत हजारो मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते. नात-ए-पाकचे वाचन करत जुलूस पारंपरिकमार्गे जाऊन बडी दर्गाह शरीफ येेथे विसर्जित झाला.

दरम्यान, शनिवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मशिदीत दुरुद व सलामचा नजराना पेश करत पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांचे स्मरण करण्यात आले. बडी दर्गाह शरीफ येेथे पोहोचल्यावर जुलूस विसर्जित झाला. येथे धर्मगुरूंनी पैगंबरांचे जीवनमान व धर्म कार्यावर प्रकाशझोत टाकत धर्माचे पैगंबर हजरत मुहम्मद सल्ललाहू अलैही वसल्लम यांच्या उपदेश व शिकवणींवर आचारण करत समाजात समानता व मानवतेचे पर्व नांदावे यासाठी समाजबांधवांनी पुढे यावे असे आवाहन केले. खतिब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन मियाँ खतिब अशरफी, काजी-ए-शहर काझी मोहिजोद्दीन यांच्या मुस्लिम धर्मगुरू व उलेमा यांनी नेतृत्व केले. जुलूसचे संचलन सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले.