Tue, Jul 23, 2019 02:28होमपेज › Nashik › वीज चोरी पकडली म्‍हणून कार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न

कार्यकारी अभियंत्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न

Published On: Sep 04 2018 2:33PM | Last Updated: Sep 04 2018 2:54PMनाशिक : प्रतिनिधी

येवला तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण करण्यात आली. यावेळी चोरी केलेल्यांनी कार्यकारी अभियंत्‍यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये मारहाण झालेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव सुरेश जाधव असे आहे. यावेळी महिला कर्मचार्‍यांनाही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी मारहाण करण्यात आली तिथे तपासणीसाठी कार्यकारी अभियंता गेले असता हा प्रकार घडला आहे.