Mon, Sep 24, 2018 04:21



होमपेज › Nashik › नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:25PM

बुकमार्क करा





नाशिक : प्रतिनिधी

नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर पेठच्या दिशेने सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजून 44 मिनिटे आणि 31 सेकंदांनी भूकंपाचे धक्के बसले. मेरीमधील भूकंपमापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. या धक्क्यानंतर दोन छोटे धक्केही जाणवले.

शहरापासून 40 किलोमीटरवर सकाळी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 195 सेकंद जाणवली. पहिल्या 3.2 रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर काही कालावधीतच 1.3 आणि 1.6 रिश्टर तीव्रतेचे धक्के बसले. पेठ, हरसूल आणि सुरगाणा भागात या धक्क्यांमुळे जमीन हादरण्याबरोबरच खिडक्यांची तावदाने हादरल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्क्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चालू महिन्यातदेखील कळवण तालुक्यातील दळवट आणि पंचक्रोशीतील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, त्यावेळी मेरीसह राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही भूकंपमापक यंत्रावर त्याची नोंद झाली नव्हती. या धक्क्यांची तीव्रता अतिशय कमी असून, यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.