होमपेज › Nashik › द्वारकाचा भुयारी मार्ग झाला पुन्हा चकाचक

द्वारकाचा भुयारी मार्ग झाला पुन्हा चकाचक

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी 

महापालिकेत स्थापन झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत द्वारका वरील भुयारी मार्गालगतचे अतीक्रमण काढणे, परिसराची साफसफाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. या आदेशाची अमलबजावणी केल्यामुळे मनपा अधिकारी कर्मचार्‍यांनी तात्काळ भुयारी मार्गाची व परिसराची साफसफाई मोहीम पूर्ण झाल्याने भुयारी मार्ग चकाचक झाला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्बन मोबिलिटी सेलच्या बैठकीत पायी चालण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मनपास्तरावर शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, विविध चौकातील सिग्नल यंत्रणा उभारणे, चौकांचे सुशोभिकरण आदी विषयांवर झाली. बैठकीनंतर मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ द्वारका येथील भुयारी मार्गाची साफसफाई मोहीम हाती घेतली. 

गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सफाई झाली नसल्याच्या तक्रारी देखील महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींना देखील अनेक महिने केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच अनेक ठिकाणी अचानक भेटी देण्याचा सिलसिला सुरू केला. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांनी आयुक्तांची धास्ती घेत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी द्वारका येथील भुयारी मार्ग व परिसराची साफसफाई केली. या साफसफाई मोहिमेमुळे नागरिक व प्रवाशांनी समाधान व्यक्‍त केले आहे.