होमपेज › Nashik › शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग

शॉर्टसर्किटमुळे गादी कारखान्याला आग

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:14PM

बुकमार्क करा

इंदिरानगर : वार्ताहर

येथील साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या अनधिकृत गादी कारखान्याला दुपारी 2.15 च्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. आगीत कापूस, कापड व इतर साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. हा गादी कारखाना अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेला असून, नागरी वसाहतीस धोकादायक असल्याने कारखाना काढण्यासाठी माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अर्ज करूनही अतिक्रमण विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.