Wed, Sep 19, 2018 14:44होमपेज › Nashik › वांग्याच्या दराचे झाले भरीत

वांग्याच्या दराचे झाले भरीत

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 12:13AMपंचवटी : वार्ताहर  

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याला अवघा दोन ते अडीच रुपये किलोला भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी काही काळ लिलाव बंद पाडल्याची घटना सोमवारी (दि.16)घडली. यामध्ये शेतकर्‍यांचे गाडी भाडेदेखील न सुटल्याने त्यांनी आपला संताप व्यक्‍त केला आहे. आवक वाढल्याने भाव कोसळले असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. मात्र, व्यापारीच एकत्र येत भाव पाडत असून, बाजार समिती प्रशासनदेखील व्यापार्‍यांच्या बाजूने असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.   

सोमवारी बाजार समितीच्या आवारात वांग्याचे लिलाव सुरू असताना प्रतिजाळी अवघा 25 रुपये भाव पुकारल्याने संतप्त शेतकर्‍यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडत बाजार समितीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, येथील अधिकार्‍यांनी आवक वाढल्याने आणि अक्षयतृतीया असल्याने बाजारात मालाला मागणी नसल्यानेच भाव पडले असल्याचे सांगत हात वर केले आहे. एकीकडे व्यापार्‍यांची मक्‍तेदारी मोडीत काढण्यासाठी बाजार समिती व्यापार्‍यांची संख्या वाढवायच्या मागे लागली आहे. त्यातून स्पर्धा निर्माण करून शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळेल; मात्र तसे होताना दिसत नाही. 

Tags : Nashik, price,  brinjal