Fri, Feb 22, 2019 05:27होमपेज › Nashik › ज्योतिषाचे गाढे व्यासंगी डॉ. कृष्णराव वाईकर यांचे निधन

ज्योतिषाचे गाढे व्यासंगी डॉ. कृष्णराव वाईकर यांचे निधन

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी

ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह व महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. कृष्णराव प्रल्हाद वाईकर (86) यांचे निधन झाले. बुधवारी (दि.12) पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर पंचवटी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. वाईकर यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. वाईकर यांचा जन्म 23 जानेवारी 1932 रोजी झाला. घरात लहानपणा पासूनच त्यांच्यावर राष्ट्रकार्याचे संस्कार झाले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेऊन अनेकदा तुरुंगवासही भोगला. महात्मा गांधींच्या सल्ल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी नाकारून स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले.

काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. संत गाडगेबाबांनी त्यांना कुष्ठपीडितांसाठी काम करण्याची सूचना केली.