Sun, Jun 07, 2020 05:41होमपेज › Nashik › शांतता भंग करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका : मोक्षदा पाटील

शांतता भंग करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका : मोक्षदा पाटील

Published On: Sep 11 2019 5:57PM | Last Updated: Sep 11 2019 5:30PM

मोक्षदा पाटीलसिल्लोड (नाशिक) : प्रतिनिधी 

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव सिल्लोड शहर व तालुक्यात अतिशय शांततेत व आनंदात साजरा करण्यात आला आहे. ही बाब अतिशय अभिनंदनीय असून (दि.१२) रोजी गणेश विसर्जन देखील शांततेत आणि सुरक्षितरीत्या साजरा करा. शांतता भंग करण्याची चूक कुणीही करू नये असे झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही. असे पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगीतले आहे. आज शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शांतता समितीचे हाजी शेख पाशुभाई, महावितरणचे अभियंता संतोष अधिकार यांची उपस्तिथी होती.

यावेळी मोक्षदा पाटील म्हणाल्या, सिल्लोड शहर जरी पोलिस प्रशासनात एक सावेंदनशिल शहर म्हणून डाग लागला आहे. हा डाग पुसून काढण्याचे काम आपण केले पाहिजे. सर्व शहरवासियांनी यासाठी सहकार्य करावे तसेच प्रत्येक नागरिक सुखाने राहावे यासाठी आम्ही झटतो, आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी वाटेल ते करू जर कोणी अळथळा निर्माण केला तर त्याची हयगय केली जाणार नाही असे खडे बोल पाटील यांनी सांगीतले.

ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या मंडळाना पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळाना निकष पूर्ण करणे बंधनकारक आहेत. याचबरोबर गणेश मंडळांनी विसर्जन चांगल्यारित्या करावे, मिरवणुकित दारू प्राशन करणे आदी प्रकार टाळावे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांवर लक्ष ठेवण्यात येणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाळण्याचे आवाहन यावेळी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. 

यावेळी शांतता समितीचे निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, हाजी शेख पाशुभाई, विनोद मंडलेचा, शेख इमरान, कमलेश कटारिया ,कैसर आझाद, अब्दुल समीर यांनी सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन मुंडे सूत्रसंचालन प्रशांत जोशी तर आभार पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी मानले.

नगर परिषद तर्फे विविध सुविधा........

गणेश विसर्जन वेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नए यासाठी नगर परिषदेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करण्यात आलेला असून विसर्जनाच्या ठिकाणी प्रकाशझोताची व्यवस्था केलेली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील व गणेश मंडळा ठिकाणी स्वच्छता करावी असे आदेश देत विज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा ओढून घ्यावयात.
अब्दुल समीर 
उपनागराध्यक्ष नप सिल्लोड