Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Nashik › स्थानिकांकडून टोल वसूली करू नये : ना. शिंदे

स्थानिकांकडून टोल वसूली करू नये : ना. शिंदे

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:41PMनाशिकरोड : वार्ताहर 

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील टोलनाक्यावर वीस किलोमीटरच्या परिघातील वाहनधारकांकडून टोलची वसूली करू नये, त्यांना तातडीने मोफत पास उपलब्ध करून द्यावेत, यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे  प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे आमदार योगेश घोलप यांनी सांगितले. 

शिंदे गाव येथील टोलनाका सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेतर्फे स्थानिक नागरिकांना मोफत पास द्यावा, स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले होते. स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी मंजूर झाली असली तर मोफत पास संदर्भात कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने स्थानिक नागरिकांना टोल भरावा लागत आहे. स्थानिक नागरिकांकडून टोलवसूली करु नये. यामागणीसाठी आ. योगेश घोलप यांनी ना. शिंदे यांच्या कार्यालयात बैठक घेतली.

चोवीस तासात अठरा लाख  

एकूण 312 कोटी रुपयांचा खर्च रस्त्याकरीता मंजूर करण्यात आला आहे. शासनाने 120 कोटी दिले. तर 192 कोटी रुपयांची गुंतवणूक संबधित व्यवसायिकाने केली. वसूलीचा करार 18 वर्षाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे शिंदे टोल नाक्यावर चोवीस तासामध्ये सुमारे 18 लाखांची टोलवसूली होते. त्यामुळे भविष्यात व्यावसायिकाला आर्थिक नफा होऊ शकतो.