Thu, Jul 18, 2019 06:28होमपेज › Nashik › पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठक

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन बैठक

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 04 2018 11:40PMनाशिक : प्रतिनिधी

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 5) जिल्हा नियोजनची बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार्‍या बैठकीकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे चार महिन्यांपासून जिल्हा नियोजनची बैठक रखडली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरदेखील प्रशासनाला बैठकीसाठी मुहूर्त सापडला नव्हता. परिणामी, जिल्ह्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. जिल्हा नियोजनाचा चालूवर्षीचा आराखडा 900.52 कोटी रुपयांचा आहे.

आयुक्‍त मुंढे यांच्यावर लक्ष

नाशिक महापालिकेेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि जि. प. सीईओ डॉ. नरेश गिते यांची पहिलीच जिल्हा नियोजन बैठक आहे. त्यातही मुंढे यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुंढे यांच्यावर लक्ष असणार आहे.