Mon, Aug 19, 2019 17:36होमपेज › Nashik › जिल्हा कोर्टात ९ हजार जागांची मेगाभरती

जिल्हा कोर्टात ९ हजार जागांची मेगाभरती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल पदांसाठी  ८ हजार ९२१ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील २३६ जागांचा समावेश आहे. 10 एप्रिलपर्यंत इच्छुकांना उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत.

बुधवारपासून (दि.28) उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत. 10 एप्रिलपर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, 16 एप्रिलला आलेल्या अर्जांची छाननी करून सूचिबद्ध उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 21 ते 27 एप्रिलदरम्यान, संबंधित उमेदवारांना जिल्हा न्यायालयातून प्रवेशपत्र मिळतील. तसेच 6 मे रोजी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल पदासाठी चाळणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल 10 मे रोजी लागणार आहे. त्याचप्रमाणे 9 जूनला कनिष्ठ लिपिक पदासाठी स्थानिक भाषेतील टंकलेखन परीक्षा होणार असून, 14 जूनला या परीक्षेचा निकाल लागेल. 17 जूनला इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा होणार असून, त्याचा निकाल 21 जून रोजी लागेल. 

तिन्ही पदांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 38 वयोगटांतील पाहिजे. तसेच अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गाकरिता वयोमर्यादा 43 वर्षांपेक्षा जास्त नसावी, अशी अट आहे. त्याचप्रमाणे लघुलेखक (स्टेनोग्राफर)  पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, तसेच शासकीय वाणिज्यीक प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ किंवा आयटीआयद्वारे घेतली जाणारी 100 श. प्र. मि. वेगाची लघुलेखन आणि कमीत कमी 40 श. प्र. मि. वेगाची इंग्रजी टंकलेखन आणि 30 श. प्र. मि. वेगाची मराठी टंकलेखन व 80 श. प्र. मि. वेगाची मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा, अशी अट आहे. त्याचप्रमाणे संगणकाचे ज्ञानही आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठीदेखील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, 40 श. प्र. मि. वेगाची इंग्रजी टंकलेखन आणि 30 श. प्र. मि. वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून, संगणकाचे ज्ञानही आवश्यक आहे. तसेच शिपाई/हमाल पदासाठी उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हे निकष पूर्ण असणार्‍या उमेदवारांना 10 एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

भरतीबाबतची सर्व माहिती www.GovNokri.in वर वेळोवेळी अपडेट होत राहील त्यासाठी www.govnokri.in ला भेट देत करत राहा

जिल्ह्यातील जागा अशा..
नाशिक जिल्ह्यात लघुलेखक पदासाठी 22 जागा आहेत. त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपिक पदाच्या 136 आणि शिपाई/हमाल 84 जागांचा समावेश आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यात लघुलेखक 1 हजार 13 जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या 4 हजार 738 आणि शिपाई/हमाल पदाच्या 3 हजार 170 जागा अशा एकूण 8 हजार 921 जागा भरण्यात येणार आहेत. 

 

Tags : District Court Maharashtra recruitment 2018  


  •