Wed, Jul 24, 2019 05:46होमपेज › Nashik › तुम्हें जवान होते हुये देखा है, काश मुझे बुढा होते तुम..!

तुम्हें जवान होते हुये देखा है, काश मुझे बुढा होते तुम..!

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:02PMउगाव : वार्ताहर

देश-विदेशात चित्रपट दिग्दर्शन गीतलेखन क्षेत्रात मला अनेक सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. पण आज  गावच्या मातीत मिळालेला गीतकार स्व. राम उगावकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे. यामुळे मी भारावलो आहे. आपले मूळ गाव, शहर, देश सोडून गेलेल्यांना खुणावणार्‍या आगामी ‘पिंपळ’ चित्रपटातील ‘साल गुजर गये... तुम्हारी याद में’ या गीतातील गावच्या जीर्ण होत असलेल्या पिंपळाने खुणावले. ‘तुम्हें जवान होते हुये मैने देखा है, काश मुझे बुढा होते तुम देख लेते..!’ अशा भावना व्यतक् करत दिग्दर्शक गीतकार गजेंद्र अहिरे यांनी मायभूमीची आठवण जागविली. 

शहरातील माणकेश्‍वर सार्वजनिक वाचनालयाचा शताब्दी महोत्सव प्रारंभ आणि गीतकार स्व. राम उगावकर पुरस्कार गीतकार, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्कारास उत्तर देताना अहिरे बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते. व्यासपीठावर भाजपाचे नेते सुरेश पाटील, माजी आमदार दिलीप बनकर, साहित्यिक शंकर बोर्‍हाडे, रामचंद्र कुलकर्णी, अ‍ॅड. लक्ष्मण उगावकर, वि. दा. व्यवहारे, नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, चिटणीस दत्ता उगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनालय शंभरीत पदार्पण करतेय ही महाराष्ट्राच्या ज्ञानसाधनेची खूण आहे. न्या. रानडेंच्या जन्मस्थळी वाचनालयाची इमारत उभी राहत आहे. अधिकाधिक लोकांचे हित साधणार्‍या उदारमतवादाची न्या. रानडेंची शिकवण आहे. त्यामुळे न्या. रानडेंच्या उदारमतवादाची समाजाला आज गरज आहे. देशात सध्या असहिष्णू वातावरण आहे. लेखकांच्या बोलण्यावर गदा येत असून, भारतीय समाज जटील झाला आहे. त्यावर उदारमतवाद हाच पर्याय आहे. व्यक्‍तिस्वातंत्र्यावर गदा येईल असे कायदे सरकारने लादू नये. न्यायाधिष्ठित कायद्याचे राज्य यावे. सामाजिक समता रिजवावी, असे मत व्यक्‍त केले.

कार्यक्रमास उपाध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, सहचिटणीस राजेंद्र खालकर, संचालक चंद्रकांत पानसरे, बाळासाहेब कापसे, अ‍ॅड. प्रवीण ठाकरे, सुनील निकाळे, सुनील कुमावत, तनवीर राजे, मालती वाघावकर, सुजाता तनपुरे, डॉ. मेघा जंगम, स्वीकृत संचालक एस. एम. सोनवणे, अशोक पगारे, संजय घुमरे, ग्रंथपाल बाळासाहेब खालकर, अ‍ॅड. दौलतराव घुमरे, नामदेव ठाकरे, इंद्रभान रायते, भास्कर पवार, उपनगराध्यक्षा स्वाती गाजरे, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती नयना निकाळे, शिवाजी ढेपले, अ‍ॅड. अशोक घुगे, प्रमोद आहेर, केशव खैरे, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, अ‍ॅड. दिलीप वाघावकर, पुंजा तासकर आदी उपस्थित होते. कवी विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले. तर अ‍ॅड. प्रवीण ठाकरे यानी आभार मानले.