Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Nashik › डिजिटल‘आयटीआय’चे दहा कोटी वळवले

डिजिटल‘आयटीआय’चे दहा कोटी वळवले

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 11:14PM

बुकमार्क करा
सातपूर : वार्ताहर  

देशातील प्रमुख औद्योगिक प्रशिक्षण संस्थांपैकी आघाडीवर असलेल्या नाशिकच्या सातपूर येथील आयटीआय हे डिजिटल आयटीआय म्हणून केंद्र व राज्य शासनाने घोषित केले होते. परंतु, सत्ताधारी मंत्रिमहेादयाने ही घोषणा फक्त कागदावरच ठेवून स्मार्ट व डिजिटल आयटीआय येाजनेला मिळालेला सुमारे 10 कोटींचा निधी लातूर व चंद्रपूरला पळवल्याचे समोर आले आहे. यामुळे नाशिकला सत्ताधार्‍यांच्या गलथान कारभाराचा फटाका बसला आहे.

दरम्यान, तत्कालीन प्राचार्य आर.एफ. पाटील यांच्या प्रयत्नातून नाशिक आयटीआयकडे असलेली मुबलक जागा तसेच या ठिकाणी असलेल्या सुविधा आणि औद्येागिक क्षेत्रातच असलेली आयटीआयची प्रशस्त जागा आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक असलेल्या स्टाफ आदींचा भक्कमपणे अहवाल केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालाच्या आधारे कौशल्य विकास विभागकडून नाशिक आयटीआय ही राज्यातील एकमेव संस्था स्मार्ट व डिजिटल आयटीआय करण्याच्या योजनेत समावेश करण्यात आला. मात्र, सत्ताधारी काही मंत्र्यांनी नाशिक आयटीआयला डावलून सुमारे 10 कोटी रुपयांच्या निधीतून पाच कोटी रुपयांचा निधी लातूरला तर पाच कोटी रुपयांचा निधी हा चंद्रपूरला पळवला आहे. 

याबाबत औद्योगिक संस्थेच्या अधिकार्‍यांना विचारले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. आहे. नाशिक आयटीआयची उपेक्षा झाली असून, कुठल्याही निकषामध्ये नसणार्‍या आयटीआयच्या नावाने सत्ताधार्‍यांनी हा कारभार केला आहे. नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता असताना निधी पळविण्याच्या घटनेमुळे औद्योगिकदृष्ट्या नाशिकसाठी ही दुर्दैवी बाब आहे. याचे राजकीय पडसाद उमठतील. नाशिकचे सत्ताधारी गाफील राहिले, त्यामूळे निधी वळता झाल्याचे बोलले जात आहे