Mon, Jun 17, 2019 18:53होमपेज › Nashik › नाशिक:पाईपलाईन फुटून हजारो लिटर डिझेल वाया

नाशिक:पाईपलाईन फुटून हजारो लिटर डिझेल वाया

Published On: Dec 07 2017 10:46AM | Last Updated: Dec 07 2017 4:33PM

बुकमार्क करा

 येवला : प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील तारुलखेडले येथे मुंबईकडून मनमाडकडे जाणारी डिझेलची पाईपलाईन मध्यरात्री फुटल्याने मोठ्या प्रमाणावर डिझेल गळती सुरु झाली आहे. रात्रीच्या वेळी आसपासच्या शेतांसह गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भारत पेट्रोलियमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, डिझेल पाईपलाईन फुटण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोठ्याप्रमाणावर पोलिस बंदोबस्तासह अग्निशमन दलाच्या तुकड्याही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.