Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Nashik › धुळ्‍यात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्‍या आंदोलन सुरूच 

धुळ्‍यात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्‍या आंदोलन सुरूच 

Published On: Jul 22 2018 5:27PM | Last Updated: Jul 22 2018 5:27PMधुळे : प्रतिनिधी 

धुळयात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आज कार्यकत्यांनी पुन्हा स्पष्ट केला. शनिवारपासुन आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी रात्री आंदोलस्थळावरच अल्‍पोपहार करत आपले आंदोलन सुरू ठेवले. आज सकाळपासुन पुन्हा शेकडो कार्यकत्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आपला पाठींबा दर्शविला. सरकारने वेळकाढू धोरण सोडून आश्वासनाचे गाजर न दाखविता मराठा समाजाला आरक्षण दयावे अशी प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.

धुळयात मराठा क्रांती मोर्चा समितीच्यावतीने शनिवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज दुस-या दिवशी देखिल सकाळपासुन शेकडो कार्यकत्यांनी आंदोलनस्थळी जावुन आपल पाठिंबा दर्शविला आहे. यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी युवक आघाडीचे यशवर्धन कदमबांडे, यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकत्यांचा समावेश होता. संघटनेच्या कार्यकत्यांनी काल रात्री आंदोलन स्थळीच खिचडी तयार करून भोजन घेऊन रात्रभर जागुन आंदोलन सुरू ठेवले. तर सकाळपासून पुन्हा ठिय्या आंदोलन पुन्हा जोमाने सुरू ठेवण्यात आले. दरम्यान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे तसेच रजनिश निंबाळकर, अतुल सोनवणे, रणजीत भोसले, शितल नवले, प्रशांत नवले, प्रकाश चव्हाण, निलेश काटे, वैशाली पाटील, हेमाताई हेमाडे, यांच्यासह सर्वच कार्यकत्यांनी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त  केली. उच्च न्यायालयाने राज्‍य शासनास मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल देखिल न्यायालयात मागीतला आहे. मात्र सरकार वेळकाढु भूमिका घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळवत आहे. राज्यात मराठा समाजाची स्थितीचे अवलोकन करणा-या समितीच्या समोर जळगाव येथे अनेकांनी शपथपत्रावर आपली बाजू मांडली आहे. या घटनेस चार महिने उलटुन देखिल अदयाप देखिल या समितीने अहवाल तयार केलेला नाही. या समितीच्या समोर धुळे जिल्हयातील मराठा लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील खेडयांमधील कुटुंबाची माहीती मांडली. यावेळी समितीने या गावांची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते. पण अदयाप देखिल या गावांची पाहणी करण्यात आली नाही. यावरून समिती देखिल वेळकाढु भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. शासन आणि समितीची अशी भूमिका असतांना न्यायालयात योग्य अहवाल जाणार की नाही, अशी स्थिती आहे. ही वस्तुस्थिती असतांना सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगुन वेळ मारून नेत आहे. वास्तविक सरकारने ठरविल्यास न्यायालयात कायदेशीर अहवाल आणि अन्य पुरावे मांडल्यास मराठा आरक्षणा प्रश्न सुटू शकतो. तसेच राज्यात होणा-या नोकर भरतील या समाजातील तरूणांना रोजगार देखिल मिळू शकतो. पण सरकारला मराठा समाजाच्या तरूणांना नोकरीतच ठेवायचे नसल्याने ते वेळकाढु भुमिका घेत आहेत. त्यामुळे आता आरक्षणा प्रश्न सुटेपर्यंत धुळयातील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आहे.