Thu, Sep 20, 2018 00:05होमपेज › Nashik › शहीद योगेश भदाणेंवर खलाणेत अंत्यसंस्कार

शहीद योगेश भदाणेंवर खलाणेत अंत्यसंस्कार

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 1:45AM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

‘शहीद योगेश भदाणे अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा...जवानांच्या कर्तृत्वाचा प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसणारा अभिमान...अन् कुटुंबीयांसह उपस्थितांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अशा शोकाकुल वातावरणात वीर जवान योगेश भदाणे यांच्यावर त्यांच्या मुळगावी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपलीकडून केलेल्या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देताना जवान योगेश भदाणे (28) यांना शनिवारी (दि.13) वीरमरण आले होते. सोमवारी ओझर विमानतळावर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आणण्यात आले. या ठिकाणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी पुष्पचक्र अर्पण केले.