Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Nashik › अभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या

अभोण्याच्या युवतीची प्रियकरासह आत्महत्या

Published On: Dec 20 2017 1:42AM | Last Updated: Dec 20 2017 1:18AM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील धाडणे शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.19) उघडकीस आली आहे. मुलगा साक्री तालुक्यातील धाडणे येथील तर मुलगी कळवण तालुक्यातील अभोणा येथील आहे. या दोघांनी केलेल्या प्रेमविवाहाला विरोध असल्यानेच आपण आत्महत्या करीत असल्याचे आणि याबाबत कुणालाही दोषी धरण्यात येऊ नये असे चिठ्ठीत त्यांनी नमूद केले आहे.

कैलास रमेश बागूल (21), दीपाली सोमनाथ चव्हाण (20) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. साक्री तालुक्यातील धाडणे फाट्यावर एका वडाच्या झाडास एकाच दोरीच्या साह्याने या युगुलाने आत्महत्या केल्याची बाब सकाळी उघडकीस आली. एका पोल्ट्रीवर कामास असताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी मे 2017 मध्ये विवाह केला. मात्र, ही बाब दोघांच्याही घरी कळू नये यासाठी दोघे वेगळे राहत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या परिवाराला याबाबत कुणकुण लागली. त्यानंतर मंगळवारी दि.19) मृतदेह आढळून आले.