Wed, Nov 21, 2018 07:13होमपेज › Nashik › 2014ची चूक 2019ला दुरुस्त करायची आहे: मुंडे

2014ची चूक 2019ला दुरुस्त करायची आहे: मुंडे

Published On: Feb 18 2018 5:07PM | Last Updated: Feb 18 2018 6:03PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

भाजपला मत देऊन आम्ही चूक केली आता आम्ही त्यांना मत देणार नाही, असे देशभरात बोलले जात असले तरी याची सुरूवात नाशिकमधील सटाणा तालुक्यातून झाली होती. याविषयी बोलताना ‘हा तालुका जे बोलला ते आता महाराष्ट्र आणि देश बोलू लागला आहे. 2014 झालेली ही चूक आता 2019 ला दुरुस्त करायची आहे’ असे सांगत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपचा समाचार घेतला. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या दिवशी सटाणा येथे सभेत ते बोलत होते.  

‘भाजपला मत देऊन आमच्याकडून चूक झाली, असा संदेश लिहिलेले डिजीटल फलक देशात सर्वात पहिल्यांदा सटाणा तालुक्यात लागले होते, असेही ते यावेळी म्हणाले. 

‘२००८ साली शरद पवारांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण फडणवीस सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली पाहीजे, असेही ते म्हणाले. 

कर्जमाफी हवी असेल तर, ‘'येथे पाहीजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नाही’ असा टोलाही त्यांनी फडणवी सरकारकला लगावला.