Thu, Jul 18, 2019 15:09होमपेज › Nashik › कृषीविरोधी धोरणामुळे  शेतकरी कर्जबाजारी : शेट्टी

कृषीविरोधी धोरणामुळे  शेतकरी कर्जबाजारी : शेट्टी

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:26AMदेवळा/ मेशी : वार्ताहर 

  केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना जनआंदोलन चालूच ठेवणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. 21) मेशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याला  प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, युवा आघाडीचे हंसराज वडघुले, केदा आहेर, पंचायत समितीच्या उपसभापती सरला जाधव, मेशीच्या सरपंच ललिता शिरसाठ, माजी सरपंच बापू जाधव, देवळा बाजार समितीचे संचालक साहेबराव सूर्यवंशी, जगदीश पवार, बापू बोरसे, हिरामण शिरसाट, विश्‍वास जाधव, प्रवीण शिरसाट, दादाजी शिरसाट, डॉ. राजेंद्र ब्राह्मणकर, कुबेर जाधव, महादू मोरे, साहेबराव मोरे, कळवण तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, देवळा तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे, बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, गोपीनाथ झाल्टे, समितीचे माजी सभापती केदा शिरसाट उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले की, देशातील सर्व शेतकरी संघटना व 25 राज्यांतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान मुक्ती संसदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचा अधिकार व शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळवून देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके आपण संसदेत मांडणार आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी युवानेते राजू शिरसाठ, प्रवीण पवार, समाधान गरुड, मोठाभाऊ मोरे, महेंद्र बोरसे, तुकाराम चव्हाण, तुषार शिरसाठ, पवन गरुड, पंकज बोरसे आदींनी परिश्रम घेतले.