Thu, Aug 22, 2019 12:44होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दुर्घटना टळली, फडणवीस बचावले (व्हिडिओ)

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दुर्घटना टळली, फडणवीस बचावले (व्हिडिओ)

Published On: Dec 09 2017 11:27AM | Last Updated: Dec 09 2017 11:47AM

बुकमार्क करा

नाशिक: पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला टेक ऑफ केल्यानंतर लँडिग करावे लागले. मुख्यमंत्री नाशिकहून औरंगाबादला जाताना पोलिस परेड मैदानावर ही घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा लँडिग करावे लागले. याआधी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दोन वेळ अपघात झाला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य काही जण औरंगाबादकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टरहून निघाले होते. पोलिस परेड मैदानातून हेलिकॉप्टरने टेक ऑफ केल्यानंतर ते काही अंतर वर गेले. त्यानंतर उड्डाण करण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात आल्यावर हेलिकॉप्टरचे लँडिग करावे लागले. हेलिकॉप्टरमधील काही जणांना उतरवण्यात आले आणि मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना झाले. 

याआधी दोन वेळा झाली होती दुर्घटना

गेल्या आठ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दोन वेळा अपघात झाला आहे. याआधी 25 मे रोजी लातूर दौऱ्यावर असताना निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ते कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. या अपघाताच्या पंधरादिवस आधी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला गडचिरोलीत किरकोळ बिघाड झाला होता.