होमपेज › Nashik › चोरीच्या दुचाकींसह संशयित ताब्यात 

चोरीच्या दुचाकींसह संशयित ताब्यात 

Published On: Jun 04 2018 1:06AM | Last Updated: Jun 03 2018 10:38PMनाशिक : प्रतिनिधी

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका दुचाकी चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संजय मुकुंदा खाडे (20, रा. जाधव संकुल, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे.

संशयित खाडे हा चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी गोल्फ क्‍लब मैदान येथे आला होता. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्‍त करण्यात आल्या आहेत.  संजय याचा ताबा सातपूर पोलिसांना देण्यात आला आहे. 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई विशाल काठे पथकासह शनिवारी (दि.2) गोल्फ क्‍लब मैदान येथे गस्त घालत होते. त्यावेळी खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार संशयित खाडे चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास खाडे काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी घेऊन आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. 2016 मध्ये त्याने सातपूर परिसरातून व त्याआधी सिटी सेंटर मॉल परिसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी एमएच 15 क्यू 1137 व आणखी एक दुचाकी जप्‍त केली आहे.