Sun, Nov 18, 2018 08:00होमपेज › Nashik › गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत एक जखमी

गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत एक जखमी

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:16AMसिन्‍नर : प्रतिनिधी

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिन्‍नर-शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव शिवारात घडली. सदाम अझाम काद्री (28, रा. पांगरी) असे जखमी दुचाकीस्वारांचे नाव आहे.

गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आटोपून गृहराज्यमंत्री केसरकर शिर्डीहून नाशिकच्या दिशेने येत होते. पाथरे फाट्यावरून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या एस्कॉर्ट ड्यूटीवरर असलेल्या वाहनचालक नाना राजाराम वाघ हे आपल्या ताब्यात बोलेरो (एमएचइओ 0147) मंत्र्यांच्या ताफ्यात सर्वात शेवटी होती. सिन्‍नर-शिर्डी महामार्गावरील रतन इंडिया कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सिन्‍नरहून पांगरीच्या दिशेने येणार्‍या काद्रीच्या दुचाकीला (एमएच 15, जीई 3231) पोलिस वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात काद्री गंभीर जखमी झाले. 

स्थानिक नागरिकांनी जखमी काद्रीला उपचारासाठी सिन्‍नर येथील खासगी रुग्णालयात नेले. काद्रीची तब्येत बिघाडल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. याप्रकरणी मुसळगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनमध्ये मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नंदू कुर्‍हाडे करत आहेत.