Mon, Sep 24, 2018 07:09होमपेज › Nashik › मालेगावी गोरक्षा फोर्स स्थापनेची घोषणा

मालेगावी गोरक्षा फोर्स स्थापनेची घोषणा

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 12:05AMमालेगाव : प्रतिनिधी

विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने गुढीपाडव्याला आयोजित हिंदू संत संमेलनात मालेगावी वीर शिवाजी गोरक्षा फोर्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर युवकांना गोरक्षा आणि हिंदूराष्ट्र निर्मितीचा संकल्प केला. गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाला विश्‍वासात घेऊन कारवाई करावी, असा संदेशही देण्यात आला.

येथील यशश्री कम्पाउंडमध्ये हे संमेलन झाले. रामायणाचार्य अखिलेश्वरदास महाराज यांनी भावी पिढीला हिंदू धर्मातील संस्कारांची शिदोरी देणे गरजेचे असल्याचे सांगत लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज प्रतिपादित केली. जैन संत नीलेशमुनी महाराज यांनी छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी यांचा आदर्श ठेवणार्‍यांना काहीच अशक्य नाही.

धर्म व गोरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने निभवावी, असा संदेश देऊन त्यांनी मालेगावात विर शिवाजी गोरक्षा फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. तर, हिंदू धर्मातील साधू-संतांवर खोटे गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात डांबले जाते. परंतू, न्यायालयातून ते निर्दोष सिद्ध झाले आणि होतील, असा विश्‍वास राष्ट्रीय क्रांतिकारी युवा हिंदूचे प्रवक्ते श्यामजी महाराज यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला स्वामी मधुगिरी महाराज, महंत योगी विलासनाथ महाराज, महंत योगी दत्तानाथजी महाराज, महंत जगदीशगिरी महाराज, महंत अनंत महाराज, वासुदेव महाराज, बन्सिलाल कांकरिया, नितीन पोफळे, यशवंत खैरनार, कविता शिर्के उपस्थित होते. शैलेश भावसार यांनी प्रास्ताविक केले.

 

Tags : Nashik, Nashik news, Malegaavi, Veer Shivaji Gorksha Force, establishment,