Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Nashik › मनपा करवाढीविरोधात जनआंदोलनाचा निर्धार

मनपा करवाढीविरोधात जनआंदोलनाचा निर्धार

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMइंदिरानगर : वार्ताहर 

महानगरपालिकेने केलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी एकत्र येत कर वाढ रद्द न केल्यास मोठे जनआंदोल उभे करण्याचा निर्धार केला आहे. पाथर्डी फाटा येथील आर.के. लॉन्स येथे सायंकाळी पाथर्डी, पिंपळगाव खांब, दाहडेगाव, अंबड गाव, वडनेर दुमाला, कामटवाडे पंचक्रोशीतील शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांची बैठक झाली.

यावेळी आमदार सीमा हिरे, शिवाजी चुंभळे, नाना महाले, भगवान दोंदे, सुदाम डेमसे, तानाजी जायभावे, साहेबराव आव्हाड, दिलीप दातीर, तानाजी फडवळ, गुरुमित बग्गा, गजानन शेलार, निवृत्त अरिंगळे, उन्मेष गायधनी, दत्ता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना अन्यायकारक करवाढ रद्द करण्यासाठी परिपत्रके तयार करून ते सर्व प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही त्या प्रभागातील नगरसेवकांनी घेऊन नागरिकांमध्ये करवाढी विरूद्ध जनजागृती करण्याचे अवाहन केले.

तसेच जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनात सहभागी करून शासनाला जागे करावे असे सांगितले. त्याशिवाय नाशिककरांच्या इंच-इंच जागेला लागणारी करवाढ रद्द होणार नसल्याचे सांगितले.